मित्रांनो राष्ट्रीय खाद्य तेल अभियान 2025 अंतर्गत 100 टक्के अनुदानावरती भुईमुख Mahadbt Biyane Anudan बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्या संदर्भातील माहिती ज्याच्यामध्ये हे अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये करता येणार आहेत अर्ज कुठे करायचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला बियाण मिळणार का 100% अनुदानावरती म्हणजे नेमक अनुदान किती मिळणार एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती बियाणे मिळणार
या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार करणार आहोत. मित्रांनो 30 जुलै 2025 रोजी राज्यामध्ये 5 कोटी 56 लाख रुपयाच्या निधीसह खाद्य तेल मिशन अभियान जे आहे ते राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.
मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 7 मे 2025 रोजी याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करून ही योजना राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे कशा प्रकारे राबवली जाणार आहे याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली होती. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तेल बियांचा समावेश करण्यात आलेला होता.
सोयाबीन असेल भुईमूग असेल तीळ असेल करडे असेल कारळ असेल अशी वेगवेगळी पिक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत भुईमूग या पिकाची उन्हाळी हंगामासाठी निवड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रती शेतकरी जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादेमध्ये तर कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत हे अनुदान दिल्या जाणार आहे. याच्यामध्ये बियाण्याचा लाभ दिला जात असताना 20 किलो च्या आणि 30 किलो च्या बॅग उपलब्ध असणार आहे
इथ जास्तीत जास्त प्रति हेक्टर 150 किलो आणि कमीत कमी 20 आर साठी 30 किलो अशा प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून एक एकर साठी जर अर्ज केला तर एक एकर साठी त्या शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे अर्थात 60 kg पर्यंत बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
100% Biyane Anudan Online Arj 2025 Mahadbt
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- नाशिक
- धुळे
- पुणे
- अहिल्यानगर
- छत्रपती संभाजीनगर
परंतु बॅग जर 20 kg च्या 30 kg च्या ज्या बॅग त्यावेळेस उपलब्ध असतील आणि बॅगच्या प्रमाणामध्ये जी काही बॅग उपलब्ध होईल त्यानुसार त्या बियाण्याची ऍडजस्टमेंट सुद्धा केली जाणार आहे. याच्यामध्ये बियाण्याचा दर 114 प्रति किलो याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल आहे आणि या अनुषंगानं जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादेमध्ये 150 किलो पर्यंत बियाणं हे 100% Anudab Biyane अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
मित्रांनो आता याच्यासाठी अर्ज कुठे करायचं तर याच्यासाठी Mahadbt farmars महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वरती बी बियाणे जे काही बियाणे आणि औषधे खाते जे बाब आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती अर्ज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहेत मित्रांनो याच्या अंतर्गत बहिमुग या पिकासाठी आठ जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे
आणि या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती या 100% अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या बियाण्यासाठी अर्ज करता येणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल तर महाडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज करू शकता.





