E Peek Pahani 2026 Rabbi रब्बी ई पीक पाहणी २५२6 सुरू

Rabbi E Peek Pahani 2025 रबी पीक पाहणीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे राज्यामध्ये रबीची ई पक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. 10 डिसेंबर 2025 पासून शेतकऱ्यांना आता रबी हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे.

मित्रांनो राज्यामध्ये (E Peek Pahani 2026) ई पीक पाहणी करण्यासाठी 30 जुलै 2025 रोजी एक वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं होतं. ज्याच्यामध्ये खरीपाची पीक पाहणी याच्यानंतर रबीची पीक पाहणी आणि उन्हाळी E Peek Pahani पाहणी याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला होता. परंतु राज्यामध्ये 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीपाच्या ईपीक पाहणीला मोठ्या प्रमाणात मुदतवाढ देण्यात आलेली होती. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहायकाच्या माध्यमातून ईपीक पाहणी केली जात होती.

आणि E Peek Pahani पाहणीचा कालावधी संपल्यानंतर आता रबीची ईपीक पाहणी सुरू करण्याचा कालावधी सुरू करण्यात आलेला आहे 10 डिसेंबर 2025 पासून 24 जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांना आता रबी हंगामाची पीक पाहणी करता येणार आहे

ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी स्वतःच्या स्तरावरती करता येणार नाही अशा शेतकऱ्यांची 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये सहायक स्तरावरून केली जाणार आहे. अर्थार्थी 10 मार्च 2026 पर्यंत रबीची ईपीक पाहणी करता येणार आहे. 10 डिसेंबर 2025 पासून आता शेतकऱ्यांना डीसीएस जे काही ईपीक पाहणीच प्लिकेशन आहे या ईपीक पाहणीच्या प्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली ईपीक पाहणी करता येणार आहे.

E Peek Pahani App पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपण यापूर्वीच ई पीक पाहणी कशी करायची याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांना शेतकरी आणि सहायक यांच्याकडून वरील मुदतीमध्ये 100% ईपीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. E Peek Pahani New App ई पीक पाहणीमध्ये काही दुरुस्त्या आल्यास मंडळ अधिकारी यांनी मोबाईल ॲपमध्ये लॉगिन द्वारे सदर दुरुस्त्या वरील निश्चित केलेल्या कालावधीमध्येच पूर्ण करणं गरजेच आहे

अशा प्रकारची सूचना देखील या पत्रकाच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे एक महत्त्वाच पत्रक काढून राज्यशासनाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ईपीक पाहणीच्या संदर्भात कळवण्यात आलेल आहे. आपली जर पीक पाहणी रबीच्या हंगामाची करायची असेल तर आजच करून घ्या. याच्यामध्ये आपली विहरीची नोंद असेल, कायम पडीची नोंद असेल, बांधावरील झाडाची नोंद असेल, फळभागाची नोंद असेल त्या नोंदी सुद्धा आपण इपीक पाहणीच्या माध्यमातून करू शकता.

Leave a Comment