राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकेत असलेल्या 2023 मधील कांद्याच्या अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो 2023 मध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून 350 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत अनुदान जाहीर केलेल होतं
याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेल होतं परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या नोंदी असतील किंवा इतर काही कारणास्तव बरेच सारे शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते आणि अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची छानणी केल्यानंतर 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील 14661 6 शेतकऱ्याला पुन्हा एकदा पात्र करण्यात आलेलं होतं याचबरोबर राज्यशासनाच्या माध्यमातून 21 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा इतर 2002 लाभार्थ्यांना देखील पात्र करण्यात आलेल होत
आणि अशा लाभार्थ्याचा अनुदान मंजुरी मिळून सुद्धा अद्याप देखील वाटप झालेलं नव्हतं ज्याच्यामध्ये नाशिक धाराशीव याचप्रमाणे पुणे सांगली सातारा धुळे याचप्रमाणे जळगाव अहिल्यानगर नागपूर रायगड अशा द जिल्ह्यातील 14661 याचबरोबर दुसऱ्यांदा मंजुरी मिळा मिळालेल्या सातारा जिल्ह्यातील 2002 शेतकऱ्यांना हे कांदा अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि अशाप्रकारे 14661 शेतकऱ्यांना हे 28 कोटी 32 लाख30507 रुपयाच अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अनुदान वितरण करत असताना वितरण व अहरण अधिकारी हे पनन संचालन पुणे यांना नेमण्यात आलेलं होतं आणि यास्तव मोठ्या प्रमाणात याठिकाणी विलंब झालेला होता
शेतकऱ्यांचा अनुदान अद्याप देखील वितरित करण्यात आलेला नव्हता आणि मित्रांनो अखेर हेच अनुदान वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे जे काही अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या निधीच वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे करण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्याचे शेतकरी पात्र असतील त्या त्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे आता अहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत
आणि पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपनिबंधक कार्यालयामध्ये कांदा अनुदानाच्या संदर्भात विचारणा केली जात होती परंतु आमच्याकडे अशा प्रकारचे काही माहिती नाही किंवा आमच्याकडे अशा प्रकारचे आदेश नाहीत किंवा निधी उपलब्ध झाला नाही अशी कारणं सांगितली जात होती आणि आता हेच अनुदान वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावरती आलेली आहे त्याच्यामुळे आता तात्काळ हे कांदा अनुदान वितरित होईल अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो साधारणपणेन ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये हे थकीत असलेलं आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांच अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाऊ शकतं याच्या संदर्भा तील काही जर काही अपडेट आले तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेऊयात





