पशु केसीसी धारकांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार KCC Card Yojana 2026

KCC Kisan Credit Card Yojana किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पशु केसीसीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कृषी व्यवसायासाठी असलेले सर्व लाभ हे पशु व्यवसायाला देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

आणि याच्याच अंतर्गत एक महत्त्वाचा असा निर्णय 11 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू केल्यामुळे पशुपालकांना खेळत्या भांडवलावरील व्याजदरामध्ये 4% सवलत देण्याबाबत मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता पशु व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यामुळे Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड धारक जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँका यांच्या मार्फत जे काही अल्पमुदतीच कर्ज दिलं जात आहे

या कर्जावरती 4% व्याजदर सवलत देण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे अर्थात पशु KCC Card केसीसी वरती घेतले गेलेली का अल्प मुदतीची कर्ज असतील या कर्जांवरती आता चार टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे याच्यामध्ये प्रकल्प धारकाने केंद्र राज्य शासन जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा पशुपालक प्रकल्पामधील सर्व पशुधनाची एनडी एलएम अर्थात भारत पशुधन पोर्टल वरती नोंदणी केलेली आवश्यक आहे व्याज परतावा पुढील प्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांना मिळणार आहे.

25000 मांसल कुकुट पक्षी किंवा प हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुकुट पक्षी 45 हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हाचरी युनिट 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावराचा गोटा 500 किंवा त्यापेक्षा कमी शेळी मेंडी गोटा 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह पालन अशा प्रकारचे जे काही पशुपालक असतील यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पशुपालकांनी केलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचेल केल्याचा तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करण आवश्यक राहील.

पशुपालन अनुदान योजना पात्रता

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:

  • प्रकल्पधारकाने केंद्र, राज्य किंवा जिल्हा परिषद अनुदान घेतलेले नसावे
  • प्रकल्पातील सर्व पशुधनाची भारत पशुधन पोर्टल (NDLM) वर नोंदणी असावी
  • कर्जाची पूर्ण परतफेड कर्ज घेतल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत करणे आवश्यक

पात्र पशुधन मर्यादा

योजनेचा लाभ खालील मर्यादेपर्यंत पशुधन असलेल्या पशुपालकांना मिळेल:

  • 25,000 पर्यंत मांसल कुकुट पक्षी
  • 5,000 पर्यंत अंडी उत्पादक कुकुट पक्षी
  • 45,000 क्षमतेपर्यंत हॅचरी युनिट
  • 100 पर्यंत दुधाळ जनावरे
  • 500 पर्यंत शेळी-मेंढी
  • 200 पर्यंत वराह पालन

अर्थात जे रेगुलर केसीसी धारक असतील अशा के पशु केसीसी धारकांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. याचप्रमाणे चार टक्के व्याज दर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता जिल्हा उपनिबंधक सहाय्यक निबंधक यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील पशुपालकांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय संबंधित जिल्हा हे समन्वय म्हणून काम पाहणार आहेत. अर्थात या योजनेच्या अंतर्गत जे काही पशु केशसी असतील त्यांना या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अर्थात 11 फेब्रुवारी 2026 पासून घेण्यात येणाऱ्या कर्जांना लागू असणार आहे अर्थी 11 फेब्रुवारी 2026 पासून पशु केसीसी वरती घेतली जाणारे कर्ज ही या व्याज सवलत योजनेला लागू असणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे पशु केशीची संदर्भात हा एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे हा जीआर आपण महाराष्ट्रडजीovडॉटin या संकेत स्थळावरती पाहू शकता..

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

Leave a Comment