लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरू झालेली आहे. भरपूर महिलांनी Ladki bahin yojana e kyc ई केवायसी केलेली आहे. अजून काही भरपूर महिला आहेत त्यांची ई केवायसी करणं बाकी आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुम्ही ई केवायसी केली तरी सुद्धा तुमचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो.
अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे. आता त्या महिला कोणकोणत्या आहेत नक्की काय होणार आहे ते समजून घ्या. इ केवायसी करताना मागितलेला आहे तो म्हणजे तुमचा आधार नंबर आणि त्यासोबतच तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर आणि लग्न नसेल झालं तर वडिलांचा आधार नंबर आता यांचा जो काही आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे
हे सगळं चेक होणार आहे आणि त्यामुळे काही महिला याच्यामध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यांना हप्ता मिळणार नाही आता त्या कोणकोणत्या महिला असतील ज्या की अपात्र होतील त्यांना हप्ता मिळणार नाही.Ladki bahin yojana e kyc केवायसी केली तरी अशा महिला आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही ते आता समजून घ्या. तरी इथे पाहू शकता की जरी तुम्ही केवायसी केली तरी तुमचा हप्ता जो आहे तो बंद होईल. आता कोणकोणती कारणे असतील तर ते इथे समजून घ्या. पहिलं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जर लाभार्थी हा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्याचा हप्ता इथे बंद होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा पहा, राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पर्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. लक्षात ठेवा कुटुंब, कुटुंब म्हणजे काय?
तर तुमचं रेशन कार्ड एका रेशन कार्डमध्ये एक विवाहित असेल किंवा विधवा घटोधित असेल म्हणजे एक महिला आणि एक मुलगी म्हणजे अविवाहित. एक महिला आणि एक मुलगी फक्त हिथे पात्र आहे तर त्यापेक्षा जर जास्त असतील तर मात्र तुमच्या कुटुंबातील महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे केवायसी मध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये ही सगळी माहिती तुमची उघड होणार आहे. त्यानंतर आता पुढे पहा ते म्हणजे किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळणार आहे.
भरपूर महिलांनी काय केलंय की त्यांचं कमी वय होतं आणि त्यांनी फॉर्म भरताना जास्त वय दाखवून 21 वर्ष पूर्ण असे दाखवून फॉर्म भरले होते. तर त्यांचं जर वय बसत नसेल कमीत कमी वयाची 21 वर्ष लागणार आहेत. 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच याचा लाभ भेटेल आणि जास्तीत जास्त 65 काही महिलांनी असं सुद्धा केलय फॉर्म भरताना 65 च्या खाली टाकलेले आहे 65 च्या आतमध्ये वय टाकलेले आहेत त्यामुळे त्यांचे कधी हप्ते भेटले नंतर हप्ते बंद झाले तर लक्षात ठेवा 21 ते 65 जो काही एज क्रायटेरिया आहे याच्यामधलेच महिलांचे हप्ते चालू राहतील जर याच्यामध्ये काही तुम्ही बदल करून दाखवलं असेल तर ते बंद होतील आधार कार्ड वरती तुमचं वय असं पाहिजे त्यानंतर तर चौथा पॉईंट आहे लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते जर आधार कार्डला तुमच बँक खात जे आहे ते लिंक असणं गरजेच आहे
लाडकी बहिण योजना – ई-केवायसी व अपात्रतेची कारणे
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असली तरी काहींचा हप्ता पुढे बंद होऊ शकतो. कारण ई-केवायसी दरम्यान पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जातो. त्यामुळे कुटुंबातील माहिती उघड होते आणि काही महिला अपात्र ठरतात.
पात्रतेची अटी
- महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक – राज्याबाहेरील लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही.
- कुटुंबात केवळ एक विवाहित/विधवा/घटस्फोटित/परित्यक्ता महिला आणि एक अविवाहित मुलगी पात्र – एका रेशनकार्डवर एकापेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही.
- वयाची अट – किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षांपर्यंतच लाभ मिळतो.
- बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक – खाते लिंक नसेल तर हप्ता बंद होईल.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा – कुटुंबाचे उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- आयकरदाता कुटुंबीय असल्यास अपात्रता – पती/वडील किंवा कुटुंबातील सदस्य आयकर रिटर्न भरत असतील तर लाभ मिळणार नाही.
- नोकरीधारक कुटुंबीय – कायम सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक कुटुंबात असल्यास हप्ता बंद होईल. केवळ कंत्राटी व स्वयंसेवी कर्मचारी (उत्पन्न 2.5 लाखांखालील) पात्र राहतील.
- इतर योजनांचा लाभ – जर महिला आधीच दरमहा ₹1500 किंवा अधिक रक्कम अन्य योजनेतून घेत असेल (उदा. संजय गांधी निराधार योजना), तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र पीएम किसानधारक महिलांना ₹500 अतिरिक्त मिळतील.
- संसद/विधानसभेचे सदस्य कुटुंबात असल्यास – अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- शासकीय मंडळ/कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, सदस्य इ. कुटुंबात असल्यास – लाभ नाकारला जाईल.
- चारचाकी वाहनधारक अपात्र – कुटुंबातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन (कार, जीप) असल्यास लाभ बंद होईल. मात्र ट्रॅक्टर असणे परवानगीयोग्य आहे.
Ladki bahin yojana e kyc लिंक नसेल तर हप्ता बंद होईल त्यानंतर पाचवा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. जास्त नसावे आता जास्त नसावे लक्षात ठेवा. कुटुंब सांगितले कुटुंब म्हणजे तुमचं पूर्ण रेशन कार्ड येत आणि या रेशन कार्ड मध्ये जे काही सर्विस वगैरे कोणी नोकरीला असेल तर लक्षात ठेवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न इथे नसलं पाहिजे. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुमच असेल तर ऑटोमॅटिकली पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड जाणार आहे आधार नंबर जाणार आहे त्यामुळे उत्पन्न कळू शकतं आणि उत्पन्न कळल्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो बंद होईल ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा येतो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जे आयकरदाता आयटी आर इन्कम टॅक्स रिटर्न भरतात तर इथे पहा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात आणि त्यांच उत्पन्न जर अडीच लाख च्या वरती दाखवत असेल तर तुमच्या आधार कार्ड वरून इथे समजणार आहे
म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्ड वरून समजेल की कोण कुटुंबामध्ये आयटीआर भरते त्यामुळे तुम्ही लगेच सापडणार आहे त्यामुळे केवायसी जरी केली तरी तुमचा हप्ता जो आहे तो बंद होईल त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी आहेत उपग्रह मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार संस्थेमार्फत काम करतात सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेतात तथापि 2.5 अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल तरच बाह्य यंत्रणा कार्यत असलेले कर्मचारी इथे स्वयंसेवी कामगार आणि कंत्रा पात्र राहतील अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच इथे जे काही कर्मचारी असतील स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील ते पात्र ठरतील अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते हप्ता बंद होईल तुमचा पतीचा असू द्या किंवा वडिलांचा असूद्या अडीच लाखापेक्षा जर असेल
ते कुटुंबामध्ये येतात कुटुंब म्हणजेच तुमचं जे काही रेशन कार्ड आहे लक्षात ठेवा त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा दर महा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत. भरपूर अशा काही महिला आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल पीएम किसान योजना असेल तर यामध्ये जर त्यांना महिन्याला पैसे भेटत असतील म्हणजे 15 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ भेटत असेल तर तिथे हप्ता बंद होईल तर लक्षात ठेवा संजय गांधी असेल निराधार योजना असतील त्यांचा त्यांना लाडक्या बहिणीचा कोणताही लाभ भेटणार नाही कारण त्यांना ₹2500 पेन्शन ही झालेली आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही.
परंतु जे काही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र ₹500चा जो काही फरक आहे तो इथे भेटणार आहेत म्हणजे लाडक्या बहिण योजनेच्या अंतर्गत त्यांना 1500 च्या ऐवजी फक्त ₹500 मिळतील त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे ते तर भरपूर कुटुंबामध्ये नसतात ज्यांच्यामध्ये असतील त्यांना इथे लाभ मिळणार नाही त्यानंतर खाली आहे अजून आहे ज्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड असतील कॉर्पोरेशनल असेल उपक्रमाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक सदस्य आहेत यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही यांच्या कुटुंबातील कुणालाही पैसे मिळणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे सात नंबरचा पॉईंट ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे आता तुम्ही पतीचा आणि जे काही वडील आहे
त्यांचा आधार नंबर दिला तर चार चाकी आरटीओ मध्ये त्यांचा रजिस्टर असणार आहे तर चार चाकी वाहन जर त्यांच्या नावावरती असेल तर तुम्ही केवायसी करून काही फायदा होणार नाही केवायसी केली तर ते समजणारे तुमच्याकडे काय आहे त्यापेक्षा केवायसी न केलेली परवडेल ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर वळून ट्रॅक्टर चालेल शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतो तर शेतकऱ्याला याच्यामधून माफ आहे म्हणजे ट्रॅक्टर असेल तर याच्यामध्ये काही हरकत नाही आता त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती नोंदणीकृत आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबावरच्या नावामध्ये कुटुंब एका रेशन कार्ड मध्ये जर कुणाच्या नावावरती फोर व्हीलर असेल लक्षात ठेवा तर ते सापडणार आहेत केवायसी केली तरीसुद्धा तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल तर अशा पद्धतीने या सगळ्या हे सगळे कारणं होती तर महिलांना हा शेअर करा कारण केवायसी करायची का नाही हे आता तुम्ही ठरवायच आहे





