मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी शेवटची तारीख ladki bahin yojana last date kyc

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत केवायसी करण्यासाठी सप्टेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली

आणि एका जीआर च्या माध्यमातून पुढील दोन महिन्यामध्ये ladki bahin yojana last date kyc लाभार्थ्याची केवायसी पूर्ण करावी अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले परंतु याच्यामध्ये आपण जर जर पाहिलं तर बऱ्याच दिवस राज्यामध्ये अतिवृष्टी होती. सुरुवातीला एक महिना या योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल पोर्टल काम करत नव्हतं याच्यामुळे केवायसी करता आली नाही

बऱ्याच साऱ्या विधवा निराधार महिलांच्या पतीचे वडिलाचे आधार कार्ड नसणं त्याच्यावरती येणारे ओटीपी न मिळणं या समस्येमुळे त्या महिला देखील या केवायसी पासून वंचित आहेत राज्यामध्ये आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि महिला वर्गाचा रोष या पार्श्वभूमीवरती केवायसी आज शिथिल केली जाणार अशा प्रकारच्याही आयडिया लावल्या जात होत्या तशा प्रकारच्या शक्यताही वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि शासनाच्या च्या माध्यमातून तशा प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली होती. परंतु या सर्वांच्या वरती आता मुख्यमंत्री माझी लाडके बहिण योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.

🪷 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना — KYC संदर्भातील महत्त्वाचा अपडेट

  1. KYC प्रक्रिया सुरूवात:
    सप्टेंबर 2025 पासून या योजनेअंतर्गत KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
  2. अडचणी:
    • राज्यात अतिवृष्टीमुळे आणि पोर्टल काम न केल्याने अनेक महिलांची KYC पूर्ण होऊ शकली नाही.
    • काही विधवा आणि निराधार महिलांना आधार कार्ड अथवा OTP संबंधित अडचणी आल्या.
  3. सरकारची बैठक:
    28 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत या सर्व समस्यांचा आढावा घेण्यात आला.
    बैठकीत KYC प्रक्रिया सुलभ करण्याबाबत चर्चा झाली.
  4. शेवटची तारीख निश्चित:
    👉 18 नोव्हेंबर 2025 ही KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
  5. सुधारणा:
    • ज्यांना आधार/OTP समस्या आहेत, त्यांच्या सोयीसाठी नवीन पर्याय (options) लवकरच पोर्टलवर उपलब्ध केले जातील.
    • त्या संदर्भात अद्याप अधिकृत तोडगा किंवा तारीख जाहीर झालेली नाही.
  6. सूचना:
    इतर सर्व पात्र महिलांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

मित्रांनो 18 नोव्हेंबर 2025 ही मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत E kyc केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. 28 ऑक्टोबर 2025 रोजी याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. ज्या बैठकीमध्ये महिलांना येणाऱ्या समस्या, पोर्टलवरती असलेले तांत्रिक दोष याचबरोबर इतर काही समस्याच्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी करावी अशा प्रकारचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. याच्या अंतर्गत विधवा निराधार महिला ज्या आहेत ज्यांचे आधार आणि ओटीपी च प्रॉब्लेम आहेत हा प्रॉब्लेम देखील लवकरच सॉल्व केला जाईल

याच्यामध्ये काहीतरी नवीन ऑप्शन ऍड केले जाईल अशा प्रकारची माहिती देखील या दरम्यान देण्यात आलेली आहे परंतु ते ऑप्शन कधी येणार किंवा त्याच्या संदर्भातील काही तोडगा निघणार याच्याबद्दल अपडेट कुठलही अद्याप देण्यात आलेलं नाही याच्या संदर्भातील काही अपडेट आलं तर ते अपडेट नक्की जाणून घेऊयात. परंतु इतर महिला लाभार्थ्यांनी मात्र 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी.

Leave a Comment