लाडकी बहीण योजना हप्ता आला नाही आजच हा फ्रॉम जमा करा ladki bahin yojana new update kyc

लाडकी बहीण योजने अंतर्गत केवायसी केल्यानंतर अपात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण एक अपडेट घेतल होत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करत असताना चुकून आपल्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शन धारक आहे अशा प्रकारची माहिती बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती

आणि यास्तव डिसेंबर महिन्यापासून या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले होते किंवा इतर बऱ्याच साऱ्या कारणामुळे महिला लाभार्थ्यांचे पडताळणीमध्ये अर्ज आल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते मिळालेले नव्हते याच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी द्यायची याच्याबद्दल माहिती घेतली होती. याचबरोबर ज्या महिलांची केवायसी चुकलेली अशा महिलांची Ladki Bahin Yojana Ekyc केवायसी ची फेर तपासणी करण्यासाठीचे निर्देश सुद्धा महिला बालविकास मंत्री अदिती तटके यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आल्याबद्दलची माहिती देखील घेतलेली होती

आणि याच्यानंतर देखील प्रश्न पडलेले होते की फेर तपासणी कशी होणार किंवा याच्यासाठी आपण आपल्या स्तरावरती काही तक्रार दाखल करू शकतो का? तर हो मित्रांनो ज्या महिला लाभार्थ्यांची ई केवायसी चुकलेली आहे किंवा इतर काही कारणास्त हप्ते बंद झालेले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज देता येत नसेल तर त्या महिला लाभार्थ्यांना आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपली कागदपत्र आणि अर्ज देता येणार आहे आता ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकलेली जसे की महिला लाभार्थ्याच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे आता घरामध्ये सरकारी कर्मचारी नाही तर याबाबतच एक प्रतिज्ञापत्र एक स्वयंघोषणापत्र महिला लाभार्थी हस्तलिखित पद्धतीने देऊ शकतात

ladki bahin yojana new update kyc

किंवा आपल्याला हा उपलब्ध करून देण्यात आलेला अर्ज देखील आपण याठिकाणी पाहू शकता ज्याच्या त्याच्यामध्ये महिला लाभार्थ्याला आपल्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही, कोणी पेन्शनधारक नाही. आपलं 2.50 लाखाच्या पुढील उत्पन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन नाही अशा प्रकारची एक स्वय घोषणा द्यायची आहे. याच्यामध्ये महिला लाभार्थ्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर आपल्या लाडकी बहिण योजनेच्या संदर्भातील सर्व माहिती द्यायचे आणि अशा प्रकारची ही जी काही दिलेली माहिती आहे ही पूर्णतः बरोबर आहे. ही खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील.

अशा प्रकारची प्रतिज्ञापत्र या ठिकाणी देऊन त्याच्यावरती लाभार्थ्याला आपली सही द्यायची आहे. हा अर्ज आपण आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करू शकता. आता ही जी काही फेर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले ते अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच केले जाणार आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी आता अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाहीत कागदपत्र घेत नाहीत अशा प्रकारे सांगितल जाईल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा भेटून महिला व बालविकास विभागात हा अर्ज आणि आपली कागदपत्र कागदपत्रामध्ये काय की तुमचा आधार कार्ड असेल किंवा तुमची इतर काही जसं रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर ती कागदपत्र तुम्ही याच्यासोबत जोडू शकता

अर्ज पहा वर क्लिक करून अर्ज पाहू शकता

सध्या तरी ही फेर तपासणी केली जात असताना ही कागदपत्र आणि ही माहिती संकलित करण्याच किंवा फेर तपासणी करण्याच काम हे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे याच्या संदर्भातील अधिकृत असा जीआर अद्याप आलेला नाही परंतु स्पष्ट असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती याच्याबद्दलचे निर्देश देण्यात आलेलेत लवकरच याच्या संदर्भातील जीआर देखील निर्गमित केला जाईल

आणि त्याच्याबद्दल देखील आपण नक्की माहिती घेऊ तुरतास तरी तुमची केवायसी चुकलेली असेल किंवा इतर कारणामुळे हप्ता बंद झालेला असेल तर आपण अशा स्वरूपामध्ये लिखित एक अर्ज जर आपल्याला जमत असेल तर आपण लेखी अर्ज सुद्धा देऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाचीशी माहिती होती फेर तपासणी करण्याच काम सुरू आहे आता एक काम बऱ्याच कालावधीपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना पुन्हा एकदा हप्ते येण्यासाठी सुरुवात केली जाईल आता केवायसी बंद झालेली आहे केवायसी नवीन सुरू होण्यासाठी जून 2026 ची तारीख सांगितली जाते.

Leave a Comment