मित्रांनो केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अर्थात न्यूक्लिअर्स बजेट फंडच्या योजनांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 30 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक प्रेस नोट काढून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील या लाभार्थ्यांना 30 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याच आव्हान करण्यात आलेल आहे.
काय आहे केंद्रवरती अर्थसंकल्प योजना कोण लाभार्थी पात्र होतात याचे अर्ज कशाप्रकारे केले जातात आणि राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या योजना याच्या अंतर्गत राबवल्या जातात याचबरोबर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकतात याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काटेरी ताडक कुंपण असेल शेळीपालन असेल याचबरोबर ताडपत्री
मित्रांनो शेतकऱ्यांना (Tar kumpan yojana ) काटेरी ताडक कुंपण असेल शेळीपालन असेल याचबरोबर ताडपत्री असेल किंवा इतर विविध बाबी याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी राबवल्या जाणारे Free Shilai शिलाई मशीन पिठाची गिरणी कांडप यंत्र अशा बाबी सुद्धा या केंद्रवरती अर्थसंकल्प योजने अंतर्गत दिल्या जातात याच्यासाठी जुलै 2025 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते. विविध जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आलेले होते परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात लक्षांक उपलब्ध असल्यामुळे हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत अर्थात न्यूक्लियस बजेट फंड योजने अंतर्गत 30 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याचं आव्हान करण्यात आलेल आहे.
मित्रांनो याचा अर्ज करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल देण्यात आलेल आहे मित्रांनो एनबी ट्रायबलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती योजना राबवली जाते हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पीओ निहाय योजना अशा प्रकारचे एक ऑप्शन दिलेली आहे ज्याच्यामधून तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तुमच्या जे काही कार्यालय असेल आदिवासी विकास विभागाच या कार्यालयाच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता.
Tar kumpan yojana maharashtra online application
आणि याच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजना यासाठी तुम्ही अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज अर्ज करू शकता आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर सध्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याकरता हे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे याच्यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 85 टक्के अनुदानावरती तार कुंपण अंगल सह काटेरी तार कुंपण आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावरती शेळीगट 85 टक्के अनुदानावरती विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसाहाय्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य
याच्यानंतर 85% अनुदानावरती पत्रावडीत द्रोण तयार करण्यासाठी मशीन घेण्यासाठी अर्थसाहाय्य आदिवासी लाभार्थ्याला आपत्कालीन मदत करणं विजेची जोडणी वीज मीटर देणं पोचा बनवण्याची कार्यशाळा घेणं आदिवासी लाभार्थ्यांना हंगामपूर्व मार्गदर्शन आणि आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना गांडूळ खते तयार करण्यासाठी मार्गदर्शन साहित्य कीट वापर करणं अशा प्रकारच्या बाबींसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये याच वेबसाईटवरती अर्जदाराची नोंदणी नावाची ऑप्शन देण्यात आलेली आहे.
अर्ज प्रक्रिया कशी करायची?
या योजनांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिकृत पोर्टल:
NB Tribal Portal ( एनबी ट्रायबल) येथे लिंक उबलब्ध आहे. )
अर्ज करण्याची पद्धत:
- NB Tribal पोर्टलवर जा
- “अर्जदाराची नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा
- नवीन अर्जदार असल्यास नोंदणी पूर्ण करा
- वैयक्तिक लाभार्थी किंवा गट लाभार्थी निवडा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा
- आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध योजना निवडून अर्ज सादर करा
- महत्त्वाची माहिती
- या योजनांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी अनुदान वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहे
- त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2026
ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर नवीन अर्ज करत असाल तर तुम्हाला अर्जदाराची नोंदणी करायची आहे आणि नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही वैयक्तिक लाभार्थी म्हणून आहात का गट म्हणून आहात का ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या लॉगिन मधून लॉगिन करून या योजनां करता अर्ज करायचे आहेत.





